प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा : बाळासाहेब पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० मार्च २०२२ । सातारा । विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर केलेल्या कारवाईत महाविकास आघाडी सरकाची सूडाची भूमिका निश्चित नाही. मात्र, त्यांची तक्रार झाली म्हणून त्यांना राग आलाय. त्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. अशात काॅंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे सहकारातील काम मोठे आहे. सहकार विभागाची माहिती घेत असताना प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा म्हणजे डाटा बसेल, असा टोला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लगावला.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सातारा येथे सहकारी संस्थातील भ्रष्टाचारा संदर्भात वक्तव्य केलेली होती. त्या संदर्भात सहकारमंत्री श्री. पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे ते म्हणाले, मुंबई जिल्हा बॅंकेवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. ते मजूर संस्थांतून निवडून येत होते. त्याबाबत त्यांची तक्रार करण्यात आली. त्याची सहकार विभागाच्या वतीने चौकशी झाल्यावर त्यांना मजूर म्हणून अपात्र जाहीर केलंय. दरेकर यांच्याबद्दल आप पक्षाच्या शिंदे यांनी सहकार व गृह विभागाकडं तक्रार केली. त्यामध्ये त्यांनी मजूर या व्याखेत बसून अनेक वर्षे मुंबई जिल्हा बॅंकेवर काम केलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

विधान परिषदेला उभे राहताना प्रवीण दरेकर यांनी प्रतिज्ञापत्रात व्यवसाय म्हणून स्वतःची नोंद केली होती. मजूर म्हणून नोंद केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये राजकीय सूड उगवण्याची महाविकास आघाडी सरकाची भूमिका निश्चित नाही. मुळात मजूर या प्रवर्गात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये गुन्हा घडला याची चौकशी सुरु आहे. त्यामुळं गृह विभाग आणि सहकार विभागाकडून हा गुन्हा दाखल केलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!