प्रतापसिंह नाईक निंबाळकर वाढदिवस उत्साहात साजरा


स्थैर्य, दि. ०३ एप्रिल २०२६, फलटण : मलठण भागातील युवा नेते प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, नगरसेवक सचिन अहिवळे, रोहित नागटिळे, किरण राऊत तसेच माजी नगरसेवक विक्रम जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच विविध माध्यमांतून शुभेच्छा दिल्या.

प्रतापसिंह नाईक निंबाळकर हे मलठण परिसरातील सक्रिय आणि अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात असून, सामाजिक व विकासात्मक कामांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व समर्थकांनीही उत्साहात सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!