दैनिक स्थैर्य | दि. 24 डिसेंबर 2024 | फलटण | तालुक्यातील उपळवे गावाचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते सोपानराव जाधव यांचे सुपुत्र प्रशांत सोपानराव जाधव याने नाशिक येथे पोलीस उपनिरीक्षक पदाचे ट्रेनिंग पूर्ण केले असून त्याची पुढील नियुक्ती ही नागपूर शहर पोलीस आयुक्तालय येथे करण्यात आली आहे.
एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येवून त्याने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातल्याने उपळवे परिसरातील तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
प्रशांत जाधव याचे वडील सोपानराव जाधव यांनी आपल्या कुटुंबासाठी अनेक खस्ता खात प्रशांत जाधव याचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्याला सुद्धा आपल्या कौटुंबिक परिस्थितीची जाण असल्याने त्याने सुद्धा अथक परिश्रम करत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.