
दैनिक स्थैर्य । 20 मार्च 2025। फलटण । कोळकी येथील प्रसाद विजयकुमार नाळे यांची नुकतीच 3/3 गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली.
2023 मध्ये झालेल्या यूपीएससी मधील सीडीएस परीक्षेत 73 वा क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने मुधोजी हायस्कूलमधून बारावी सायन्स उत्तीर्ण झाला. त्यानंतर बीएचे शिक्षण पुणे येथील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर एलएलबीचे शिक्षण दिल्ली विश्वविद्यालयातून पूर्ण केले. हे शिक्षण सुरू असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
तिसर्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. त्यामागे त्यांचे परिश्रम, कष्ट, चिकाटी, जिद्द होती. नुकतेच 11 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमधून पूर्ण केले. व त्यांची लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक दि. मा. नाळे यांचे ते नातू असून विजयकुमार नाळे व सौ. हेमा नाळे यांचे ते सुपुत्र आहेत. आई-वडील शेतकरी असून आपला मुलगा सैन्यात अधिकारी व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. यांचे चुलते बरड शाळेचे मुख्याध्यापक उदयकुमार नाळे व चुलती सौ. विमल नाळे यांनी त्यास मार्गदर्शन झाले. त्याची बहीण मृणाल हिने बीएससी अॅग्री हे शिक्षण घेतले आहे. तिचेही त्याला यासाठी मार्गदर्शन मिळाले. दुसरी बहीण शिवानी डॉक्टर आहे. भाऊ मुकुंद हा बीएएमएस च्या दुसर्या वर्गात शिक्षण घेत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.