प्रणबदांची कारकीर्द कायम स्मरणात राहणारी – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ७: प्रणबदांचे व्यक्तीमत्व हे बहुआयामी असे होते. केंद्रात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. प्रणबदांचे केंद्रीय कॅबिनेटच्या सब कमिटीचे काम आपणा सर्वांसाठीच नेहमी प्रेरणादायी आहे. प्रणबदांची कारकीर्द कायमच स्मरणात राहणारी आहे, अशा शब्दात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शोकभावना व्यक्त केल्या. 

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच हैद्राबाद मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशिल होते. पाटबंधारे मंत्री पदाची कारकीर्द कायमस्वरूपी स्मरणात राहणारी अशी होती. 

सभागृहाचे माजी सदस्य विजय मुडे, रामनाथ मोते, बलभिमराव देशमुख, युनुस हाजी जैनोद्दिन शेख, जयवंतराव ठाकरे यांच्या निधनाबद्दलही सभापतींनी शोकभावना व्यक्त केल्या. 

उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, जयंत पाटील, निरंजन डावखरे, सुरेश धस, सदाभाऊ खोत, कपिल पाटील, भाई जगताप आदींनी शोक प्रस्तावावर शोक भावना व्यक्त केल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!