आय.डी.बी.आय.बँकेच्या फलटण शाखेतील प्रमोद शास्त्री सेवानिवृत्त


दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । फलटण। येथील आय.डी.बी.आय. बँकेच्या शाखेतील कर्मचारी प्रमोद शास्त्री आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा आय. डी. बी. आय. बँकेच्या वतीने शाखाधिकारी निळकंठ देसाई व आय. डी. बी. आय. कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष अरविंद बेडेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रमोद शास्त्री यांनी आपल्या 36 वर्षांच्या कार्यकाळात औरंगाबाद, म्हसवड, राणंद, वाठार कॉलनी, साखरवाडी, बिजवडी, फलटण आदी शाखांमधून सेवा बजावली. आपल्या उत्तम सेवेमुळे अनेक ग्राहकांशी त्यांचा सलोख्याचा संबंध निर्माण झाला होता.

यावेळी शाखाधिकारी देसाई, राजेंद्र बेडगकर, नंदकुमार गद्रे, संजीव बर्वे, प्रभातकुमार, प्रसूनसुधा गुप्ता, विक्रम सोनवणे, अशोक ओतेकर, सुनील शिंदे, अधिक शिंदे, सौ.अश्‍विनी शास्त्री, प्रियांका शास्त्री, खातेदार प्रतिनिधी मुकुंद धनवडे आदींसह बँक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी कोवीड काळातील दिवंगत सहकारी व नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!