प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे २०२०चे पुरस्कार जाहीर


 

अशोक कोळी, देविका दफ्तरदार, गणेश विसपुते, अविनाश पाटील, विनोद कांबळे, हिमांशू स्मार्त यांचा समावेश

स्थैर्य, सातारा, दि. १७ : सातारा येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीचे साहित्य, कला, संस्कृती व समाज परिवर्तनासाठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

या पुरस्कारांमध्ये सहा मान्यवरांचा समावेश आहे.गेली वीस~ पंचवीस वर्षे सातत्याने जे आपल्या क्षेत्रात निष्ठेने काम करत आहेत त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड हे पुरस्कार दिले जातात.अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि लेखक प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी दिली.

दहा हजार रुपयांचे चार व पाच हजार रुपयांचे दोन असे एकूण सहा पुरस्कार यात आहेत. त्याचे हे तिसरे वर्ष आहे. या आधी दोन वर्षे पंचवीस हजार रुपयांचे दोन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यासह पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.

यावर्षीचे जाहीर करण्यात आलेले पुरस्कार पुढील प्रमाणे दहा हजाराचा धनादेश, मानचिन्ह व शाल या स्वरूपाच्या पुरस्काराचे मानकरी -प्रसिद्ध कथा,कादंबरीकार अशोक कौतुक कोळी,जामनेर,जळगाव (कमल मनोहर कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार), प्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार,पुणे (प्रा. मनोहर कोपर्डे स्मृती कला पुरस्कार), प्रसिद्ध कवी, लेखक, अनुवादक, संपादक गणेश विसपुते, पुणे (डॉ. चंद्रशेखर जहागीरदार स्मृती संस्कृती पुरस्कार), अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, धुळे (हुतात्मा विलास ढाणे स्मृती समाज परिवर्तन पुरस्कार).

नवोदितांसाठी पाच हजारांचा धनादेश, मानचिन्ह व शाल स्वरुपाचे पुरस्कार -विनोद कांबळे, कोल्हापूर. (राधाबाई किसन कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार), हिमांशू स्मार्त, कोल्हापूर. (पारुबाई भानुदास परदेशी स्मृती कला पुरस्कार) या पुरस्कारांचे वितरण सध्याचा कोरोनाकाळ लक्षात घेऊन कधी घ्यायचा हे नंतर जाहीर करण्यात येईल.

पुरस्कार निवडीचे काम प्रतिष्ठानचे विश्वस्त कवी, लेखक, अनुवादक, संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार डाॅ. विजय चोरमारे, मुंबई, समीक्षक डॉ. गजानन अपिने, पुणे आणि कवी, साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या समितीने पाहिले. 

प्रतिष्ठानच्या विश्वस्तांमध्ये अँड. श्रेयश कोळेकर-कराड, ज्योत्स्ना पाटील-शिंदे-मुंबई, सातारचे रंगकर्मी चंद्रकांत कांबिरे व कवी वसंत शिंदे यांचा समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!