दैनिक स्थैर्य । दि. 19 जानेवारी 2022 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील हे पुन्हा तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. प्रल्हाद साळूंखे – पाटील यांनी साखरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये व पोटनिवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावत राजे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या खेळीमध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यानंतर नुकतीच जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो खासदार शरद पवार व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. सदरील भेटीमुळे सारखवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पॅटर्न जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दिसणार ? असा प्रश्न सुद्धा प्रल्हाद पाटील व शरद पवार यांच्या भेटीमुळे उपस्थित झालेला आहे.
साखरवाडी येथील “न्यू फलटण” च्या घडलेल्या घडामोडींच्यानंतर काही काळ जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील हे सक्रियरित्या कुठेही दिसत नव्हते. तदनंतर जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील हे साखरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा सक्रिय सहभाग घेत राजे गटाला साखरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्याच्या खेळीमध्ये यशस्वी झाले. साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम भोसले हे दोन प्रभागामधून निवडून आल्याने एका जागेसाठी पोटनिवडणूकीमध्ये सुद्धा राजे गटाला यश मिळू दिले नाही. ह्या सर्व प्राश्वभूमीवर फलटण तालुक्यातील प्रल्हाद साळुंखे – पाटील यांचा गट पुन्हा एकदा चार्ज होण्यास सुरवात झालेली आहे.
आगामी काही महिन्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामध्ये प्रल्हाद साळुंखे – पाटील हे आपला करिष्मा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. प्रल्हाद साळुंखे – पाटील यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये आहे. सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जरी प्रल्हाद साळुंखे – पाटील हे सक्रिय रित्या कोठेही दिसत नव्हते तरी ते आपल्या कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये प्रल्हाद साळुंखे – पाटील हे कायमच सहभागी होत होते. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रल्हाद साळुंखे – पाटील हे आपला करिष्मा नक्कीच दाखून देतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.