स्थैर्य, फलटण, दि. ४ : येथील योगेश मेडीकल स्टोअर्सचे योगेश शहा यांचे वडील प्रकाशचंद्र माणिकचंद शहा यांचे अल्पकालीन आजाराने वयाच्या ७२ व्या वर्षी राहत्या घरी आज रविवारी निधन झाले.
विविध क्षेत्रातील मान्यवर, शहरातील औषध विक्रेते, डॉक्टर्स, व्यापारी, आप्तेष्ट, मित्रमंडळी व शहरवासीयांनी अंत्यदर्शन घेऊन शहा कुटुंबीयांचे सांत्वन केले. येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.