दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । सातारा । संत गाडगे महाराज आश्रम शाळा गोंदवले बु. येथे कार्यरत असणारे व तडवळे ता. खटाव गावचे रहिवाशी आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रकाश भीमराव बनसोडे सर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते महेंद्र शीलवंत यांच्या मामांचे चिरंजीव होते. अतिशय मनमिळावू , कर्तव्यदक्ष स्वभाव असणाऱ्या प्रकाश बनसोडे सरांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा भार एकहाती पेलला होता.त्यांनी आपल्या भावांना उच्च शिक्षण देऊन स्वत: च्या पायावर उभे केले आहे. त्यांचे बंधू राहुल हे मुंबई महानगरपालिकेच्या पीएमटी वाहक पदावर आहेत. दुसरे भाऊ मेकॅनिकल इंजिनिअर झाले आहेत.बहीण रुपालीचे ही शिक्षण त्यांनी केले आहे.त्यांच्या पत्नी खटाव तालुक्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.त्यांना एक कन्या आहे. त्यांची सतरा अठरा वर्ष सेवा झाली असून आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं सक्रिय योगदान आहे.ते स्वतः धम्म चळवळीत सक्रिय होते. त्यांच्या पश्चात आई बेबीताई वडील भीमराव, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल प्राथमिक शिक्षक, नातेवाईक, मित्र व बुद्धिस्ट शिक्षक सहकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांनी प्रकाश भीमराव बनसोडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.