प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आता पेटीएमवर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी, तसेच क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालकीहक्क असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने अॅपवर प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय) किंवा पीएम आयुष्मान भारत हेल्थ इन्शुरन्सचा समावेश केला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांची पात्रता तपासण्यासोबत योजनेचा लाभ घेता येईल. ही मोहिम आरोग्यसेवेमध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याच्या भारत सरकारच्या मिशनशी संलग्न आहे.

पेटीएम अॅपच्या माध्यमातून वापरकर्ते पीएमजेएवायचे फायदे देणा-या खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल्सची यादी पाहू शकतात. पात्र वापरकर्ते त्वरीत जवळचे हॉस्पिटल शोधू शकतात, पीएमजेएवाय योजनेंतर्गत नोंदणीकृत आणि उपलब्ध आरोग्य विम्याच्या संपूर्ण श्रेणीचा लाभ घेऊ शकतात. ते त्यांच्या फोनवरील त्यांची पीएमजेएवाय हेल्थ कव्हरबाबतची माहिती हॉस्पिटलचे समुपदेशक आणि कर्मचारी यांना दाखवू शकतात.

पीएमजेएवाय ही केंद्र सरकारची योजना आहे, जी प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देते. या योजनेंतर्गत रूग्णाचा हॉस्पिटलायझेशन खर्च, हॉस्पिटल नंतरची काळजी, अन्न सुविधा, औषध, निदान आणि प्रयोगशाळा सुविधा अशा ब-याच गोष्टींचा समावेश आहे. या योजनेमध्ये कोविड-१९ उपचारांचा देखील समावेश आहे.

पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, “आम्ही भारतात डिजिटल समावेशनाप्रती कटिबद्ध आहोत आणि ऑनलाइन आरोग्य सेवा हा त्यामधील एक महत्त्वाचा भाग आहे. पेटीएम अॅपवर पीएमजेएवाय हेल्थ कव्हरचा समावेश पात्र वापरकर्त्यांना सरकारी आरोग्य योजनांचा एकसंधी लाभ देईल.”

पेटीएमने हेल्थ आयडी तयार करण्यासह आरोग्य सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करून नागरिकांना सक्षम केले आहे. वापरकर्ते टेलिकन्सल्टेशन्स बुक करू शकतात, फार्मसीमधून खरेदी करू शकतात, लॅब टेस्ट बुक करू शकतात, आरोग्य विमा खरेदी करू शकतात, वैद्यकीय कर्जासाठी अर्ज करू शकतात आणि अशा ब-याच गोष्टींचा लाभ घेऊ शकतात. याद्वारे वापरकर्ते त्यांच्या सर्व आरोग्यसेवा गरजांसाठी पेटीएम अॅपवर अवलंबून राहू शकतात.

पेटीएम अॅपवर पीएमजेएवाय पात्रता तपासण्याची पद्धत:

  • पेटीएम अॅपमध्ये लॉगइन करा.
  • खाली स्क्रोल करा, पेटीएम हेल्थमध्ये असलेल्या पीएमजेएवाय पर्यायावर क्लिक करा किंवा सर्च

बारमध्ये पीएमजेएवायसाठी सर्च करा.

  • चेक एलिजिबिलिटी पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे राज्य प्रविष्ट करा.
  • माहिती भरा जसे नाव, रेशन कार्ड, एचएचडी क्रमांक, मोबाइल क्रमांक व आरएसबीवाय यूआरएन
  • वापरकर्त्याच्या माहितीसह कुटुंबामधील सदस्यांची माहिती दिसेल.

Back to top button
Don`t copy text!