खटकेवस्तीत 100 गरजू कुटूंबाना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल; विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजेंच्या हस्ते आज शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील खटकेवस्ती येथे 100 गरजू गरीब कुटूंबाना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधून देण्यात येणार आहे. यासाठी लागणारी जागाही खटकेवस्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबधीत जागेचा सातबारा उतारा लाभार्थांच्या नावावर होणार असून असून हा गृह उपक्रम राज्यातील आदर्श व दिशादर्शक आहे. या योजनेचा शुभारंभ आज शनिवार, दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती खटकेवस्तीचे ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच बापूराव दत्तात्रय गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

सदरील कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण पंचायत समितीचे उपसभापती संजय सोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमास फलटण पुर्व भागातील ग्रामस्थांनी उपस्थित राहवे असे आवाहन खटकेवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बापूराव दत्तात्रय गावडे, उपसरपंच मंदाकिनी तानाजी सस्ते, ग्रामसेवक संजय देवकर, सविता बजरंग खटके, योगेश तानाजी गावडे, धनंजय पवार, उषाताई गावडे, वैशाली नवनाथ गावडे, लक्ष्मण तात्या दडस, रंजना सचिन खटके, नलिनी रामचंद्र खटके, नवनाथ नारायण खटके यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!