प्रभूदत्त महाराज यांना श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार


स्थैर्य, सातारा, दि. 31 ऑक्टोबर : सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार हैदराबाद येथील प्रभूदत्त महाराज रामदासी यांना जाहीर झाला आहे. हैदराबाद येथे श्री समर्थ कामधेनू गोशाळा श्री नारायण महाराज आश्रम जियागुडा, भाग्यनगर येथे नऊ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता होणार्‍या कार्यक्रमात हा पुरस्कार संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमास श्री माणिकप्रभू महाराज संस्थानचे पिठाधीपती ज्ञानराज माणिकप्रभू महाराज उपस्थित राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!