दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । सातारा । जागतिक हिपॅटायटीस (काविळ) दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या प्रभात फेरीला जिल्हा शल्यिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
यावेळी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग कॉलजेचे अधिकारी यांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी डॉ. चव्हाण यांनी काविळ नियंत्रण कार्यक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.
जागतिक हिपॅटायटीस (काविळ) दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा कारागृह येथे काविळबाबत जनजागृती व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.