प्रभाकर देशमुख यांच्याकडून येरळा नदीवरील पुलाची पाहणी


 

स्थैर्य, खटाव, दि. ३० : खटाव तालुक्यातील भुरकवडी – सिद्धेश्‍वर कुरोली रोडवर असलेल्या येरळा नदीवर मागील काही वर्षापूर्वी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने बांधलेल्या पुलाचा दोन्ही बाजूकडील भराव अतिवृष्टीच्या महापुरामुळे खचत चालला आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे या पुलाला धोका निर्माण झाल्याने माण-खटावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख व खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी या पुलाची पाहणी केली.

यावेळी पाहणी दौर्‍यावेळी वडूज येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, सागर देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. या पुलाच्या पाहणीबरोबर गावची पाणी पुरवठा करणारी जुनी विहीर वाहून गेली असून नदीकाठच्या शेतकर्‍यांचे शेतीपिकाचे व शेती साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची पाहणी देशमुख व मांडवे यांनी करून संबंधित यंत्रणेला फोनवरून सूचना करण्यात आल्या आहेत.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव कदम, माजी सरपंच एस. के. कदम, माजी उपसरपंच ए. के. कदम सर, चेअरमन हणमंत कदम, माजी चेअरमन मधुकर कदम, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष कैलासराव जाधव, युवा नेते मनोजदादा कदम, पोलीस पाटील किरण कदम, जालिंदर कदम, दिलीप कदम, संतोष कदम, भुरकवडी ग्रामस्थ उपस्थित होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!