दैनिक स्थैर्य | दि. १७ डिसेंबर २०२४ | फलटण |
जायंट्स ग्रुप फलटणचे सेक्रेटरी श्री. प्रभाकर भोसले सर यांची जायंट्स वेलफेअर फौंडेशन, फेडरेशन २ सी येथे ‘फेडरेशन ऑफिसर’ म्हणून नेमणूक तर ग्रुपचे माजी अध्यक्ष श्री. शांताराम आवटे सर यांची ‘युनिट डायरेक्टर’ म्हणून निवड झाली आहे.
जायंट्स वेलफेअर फौंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भारतात व विदेशातील अनके राज्यात असंख्य शाखा कार्यरत आहेत. जायंट्स वेलफेअर फौंडेशनमधील अनेक विभागापैकी कोल्हापूर ते बारामती हा विभाग असून तो जायंट्स वेल्फेअर फौंडेशन, फेडरेशन २ सी या नावाने ओळखला जातो. या विभागात एकूण १४ युनिटस् असून यात ७८ ग्रुप सामाजिक कार्य करीत आहेत.
या निवडीबद्दल प्रभाकर भोसले व शांताराम आवटे यांचे जायंट्स ग्रुपचे सदस्य श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, मोहनराव ना. निंबाळकर, अरविंद निकम, दिलीपसिंह भोसले, फेडरेशनचे माजी ऑफिसर शिरीष शहा, जायंटस ग्रुपचे अध्यक्ष दीपकशेठ दोशी, माजी अध्यक्ष गिरीश चितळे, रामदास रेवणकर, डॉ. प्रशांत माळी, प्रमोद शहा, डॉ. अनिल माळी, सौ. योजना देवळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
जायंट्स ग्रुप फलटणचे २०२५ चे संचालक मंडळ :
१. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
२ श्री. दिलीपसिंह जी. भोसले
३. श्री. अरविंद एस. निकम
४. श्री. शिरीष शहा
५. श्री. बाहुबली एस. गांधी
६. श्री. धनाजीराव जाधव
७. श्री. हणमंतराव घनवट
८. श्री. मेघःशाम रणसिंग
९. श्री. डॉ. सागर निंबाळकर
१०. श्री. शंभूराज एम. नाईक निंबाळकर
११. श्री. प्रदीप पी. फडे
सदस्य :
१) श्री. मोहनराव ना. निंबाळकर
२) श्री. शांताराम आवटे
३) श्री. अरंजय शहा
४) श्री. बाहुबली गांधी
५) श्री. दीपक दोशी
६) श्री. शिरीष शहा
७) श्री. प्रभाकर व्ही. भोसले, सेक्रेटरी
व इतर.