पोक्सो गुन्हयातल्या आरोपीला दोन दिवसांची कोठडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १४ : चोरीला गेलेल्या मोबाईलच्या सिमकार्डवरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून एक चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. अनिल थोरात (वय- 33 रा. 339 मंगळवार पेठ सातारा) असे त्या नराधमाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 14 जून रोजी चोरीस गेलेल्या सिमकार्डवरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या अनिल थोरात याला शाहूपुरी पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून आणखी एक मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात शाहुपुरी पोलीसांना यश आले. त्याने दि .27जून रोजी पहाटे साडे तीन वा.चे सुमारास एका घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला धमकी देवुन घरातुन पळुन गेला. त्याने जाताना तिचे सिमकार्ड घेऊन गेला. त्याबाबत शाहुपुरी पोलीस ठाणेस गु.र.नं .२३७ / २०२० भा.दं.वि.स.क. ३५४,४५२ बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला होता.

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलील अधिक्षक धिरज पाटील, सहा.पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी तांत्रिक विश्लेषनांचे आधारे आरोपी शोधून काढण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शाहुपुरी पोलीस ठाणेचे स.पो.नि. विशाल वायकर, स.पो.नि. संदीप शितोळे, पोहवा अतिश घाडगे, पो.कॉ. सतीश बाबर, पोकॉ सुनिल भोसले गुन्हे अन्वेषन विभागाचे पोहवा.हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, ओकार यादव, स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते, चालक नितीन शिंगटे यांनी कौशल्यपुर्ण सचोटीने गुन्हयाचा तपास करुन गुन्हा तांत्रिक बाबींवर गुन्हयाचा छडा लावून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. गुन्हयाचा तपास स.पो.नि. विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण विभाग शाहुपुरी सातारा हे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!