पॉवरप्लेने वार्षिक ४० पट वाढ नोंदवली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । मुंबई । पॉवरप्ले जे एक एंड-टू-एंड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ऍप्लिकेशन आहे, त्याने २०२१ सालासाठीचे वार्षिक कामकाजाचे आकडे नोंदवले आहेत. हे आकडे उत्साहवर्धक असून पॉवरप्ले हे बांधकाम उद्योगासाठी ऑपरेटिंग सिस्टमनंतर त्याच्या अपेक्षित लक्ष्याजवळ जात आहे. जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२  या काळात, एसएएएस प्लॅटफॉर्मने त्याच्या सक्रिय व्यवसायांमध्ये ४० पट वाढ व ऑपरेटिंग सिस्टम व्यवसायामध्ये १०० पट आश्चर्यकारक वाढ नोंदविली आहे. सक्रिय व्यवसायातील प्रत्येक वापरकर्त्याने अॅपवर व्यतीत केलेला सरासरी वेळ दररोज २६ मिनिटे असतो, तर ऑपरेटिंग सिस्टम व्यवसाय विभागात, हाच आकडा दररोज ४०  मिनिटे इतका आहे.

भारतातील बांधकाम क्षेत्राच्या १ टक्के म्हणजे सुमारे ७००० कोटींच्या व्यवसायाला पॉवरप्लेने सुविधा प्रदान दिली आहे. पॉवरप्लेवर ११०० कोटी रुपयांचे बांधकाम साहित्य व्यवस्थापित केले गेले आहे. या प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे २,५०,००० कामगार शक्ती यशस्वीरित्या व्यवस्थापित करण्यात आली आहे. पॉवरप्ले ने उत्पादकता वाढवताना, विलंब टाळून आणि समस्यांचे जलद निराकरण करताना विविध प्रकल्पांचा ९-१२ % खर्च वाचविण्यात मदत केली आहे.

पॉवरप्ले चे सीईओ इश दीक्षित म्हणाले, “बांधकाम प्रकल्पांमध्ये कामाच्या विघटन संरचनांची इतकी गुंतागुंतीची उतरंड आहे की केवळ संवाद आणि सहयोग कठीणच नाही तर काही प्रकरणांमध्ये गैरसमज देखील अपरिहार्य असू शकतात. पारंपरिक प्रक्रियांचा वापर केल्याने एकूणच विलंब आणि अयोग्यता वाढते, ज्यामुळे खर्च वाढतो आणि त्यानंतरच्या प्रकल्पाला विलंब होतो. आमचे अॅप केवळ प्रकल्पाच्या मालकाला दूरच्या ठिकाणाहून प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती देत नाही, तर त्याला साइटवरील संसाधने कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यात देखील मदत करते आणि विशेषत: ते साइट अभियंते आणि कंत्राटदारांना संवाद साधण्यास व समजून घेण्यास मदत करते, जे आवश्यक आहे.”

पॉवरप्ले २०२० मध्ये सुरू झाले व आज त्यांच्याकडे एनसीआर, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, जम्मू, मणिपूर आणि अगदी केंद्रशासित प्रदेश अंदमानसह भारतातील सर्व राज्ये समाविष्ट आहेत. सर्व राज्यांमध्ये त्याची प्रगती योग्य होत असून त्यात महाराष्ट्रात १६% त्यानंतर तमिळनाडू व कर्नाटक ९%, गुजरात ८%, एनसीआर व तेलंगणा ७% व मध्य प्रदेशात ६% हिस्सा आहे.


Back to top button
Don`t copy text!