सुरतच्या ONGC मध्ये शक्तिशाली स्फोट, 2 कर्मचारी बेपत्ता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि. 24 : सुरतच्या हाजिरा परिसरातील ONGC कारखान्यात आज पहाटे एक शक्तिशाली स्फोट घडल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर कारखान्यात आगसुद्धा लागल्याचं वृत्त आहे.

अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली आहे.

ANI ने स्फोटाचा एक व्हीडिओदेखील ट्वीट केला आहे. स्फोटानंतर भूकंप झाल्यासारखं वाटल्याचं स्थानिकांनी म्हटलंय.

बीबीसीने सुरतचे जिल्हाधिकारी डॉ. धवल पटेल यांच्याशी बातचीत केली.

ते सांगतात, “हाजिराच्या ONGC कारखान्यात आग लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अडीच वाजता हायड्रोकार्बन वायू जमा झाला त्यानंतर 3 वाजून 5 मिनिटांनी एकामागून एक तीन स्फोट झाले.

अग्निशमन दलासह ONGC चं आगनियंत्रण पथक घटनास्थळी उपस्थित आहे. पोलीस, CISF तसंच संबंधित शासकीय अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित आहेत. या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.”

ONGC याठिकाणी वायूचा दाब कमी करण्याबाबत काम करत होती. आग याच परिसरात लागली आहे. कारखान्याच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी आग पसरलेली नाही, असं डॉ. पटेल यांनी सांगितलं.

अग्निशमन दलाचे अधिकारी ईश्वर पटेल यांनीही याबाबत अधिक माहिती दिली.

“मुंबईकडून हाजिराकडे येणाऱ्या गॅस पाईपलाईनला ही आग लागली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण काही ठिकाणी वायूगळती सुरू आहे. वायूगळती बंद होत नाही, तोपर्यंत आग काही प्रमाणात कायम राहू शकते. आग आणि गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय दोन ONGC कर्मचारी बेपत्ता असून त्यांचाही तपास सुरू आहे,” असं ईश्वर पटेल म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!