देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी फलटण शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा आज बंद राहणार

महावितरणची माहिती; सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार या वेळेत काम चालणार


स्थैर्य, फलटण, दि. २३ सप्टेंबर : महावितरणच्या वतीने उच्च व लघुदाब वीजवाहिन्या आणि वितरण रोहित्रांच्या (DTC) आवश्यक देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी आज, मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी फलटण शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात येणार आहे. सकाळी ११:३० ते दुपारी ४:३० या वेळेत हे काम चालणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

या कामासाठी २२ केव्ही फलटण शहर वाहिनीवरील मलठण, जिंतीनाका, शेतीशाळा, स्वामी विवेकानंदनगर, बिरदेवनगर, ताममाळ, भडकमकरनगर, पद्मावतीनगर, बारस्करगल्ली इत्यादी परिसराचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

त्याचबरोबर, २२ केव्ही वाय. सी. फिडरवरील कोळकी, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, मार्केट यार्ड परिसराचा वीजपुरवठा देखील सकाळी ११:३० ते दुपारी ४:३० या वेळेत बंद राहील.

नियोजित वेळेपूर्वी देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास वीजपुरवठा त्वरित सुरळीत केला जाईल. सर्व वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!