जावली सोसायटीवर राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील जावली येथील जावली विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातुन ८, महिला राखीव मतदारसंघातून २, अ.जा. १, वि.जा.भ.ज. १ व इतर मागास प्रवर्ग १ असे संचालक निवडणूक लढवुन बहुमताने विजयी झालेले आहेत. यामध्ये जावली विकास सोसायटीवर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा फडकला आहे.

सर्वसाधारण मतदार संघातील ८ जागांसाठी १६ उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. त्यापैकी खालील ८ बहुमताने विजयी झाले. बाळासाहेब युवराज चवरे, राजाराम शंकर कारंडे, ज्ञानदेव सोमा बरकडे, दिलीप बाबुराव शिंदे, शिवाजी गंगाराम नाळे, शंकर सखाराम नाळे, भागूजी सतू पोकळे, कैलास ज्ञानदेव शेवते.

महिला राखीव मधील २ जागांसाठी ५ उमेदवार निवडणूक आखाड्यात होते त्यापैकी चंद्रभागा किसन गोफणे व फुलाबाई विठ्ठल पोकळे बहुमताने विजयी झाल्या तर उर्वरित ३ राखीव मतदार संघातील प्रत्येकी एका जागेसाठी प्रत्येकी २ उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. त्यापैकी प्रत्येकी एक खालीलप्रमाणे बहुमताने विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघ अशोक एकनाथ आढाव, वि. जा. भ. ज. राखीव मारुती दादू गोफणे आणि इतर मागास वर्ग राखीव सुभाष दत्तू नाळे हे विजयी झाले आहेत.

रासपचे ज्येष्ठ नेते काशिनाथ शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीवर १२ विरुद्ध १ असा विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. रासपच्या या यशाबद्दल राज्यभरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर, महासचिव बाळासाहेब दोडतले, माऊली सलगर, भाऊसाहेब वाघ, बबनदादा वीरकर, मामुशेठ वीरकर, खंडेराव सरक, वैशालीताई वीरकर पुजाताई घाडगे, रमेश चव्हाण, शेखर खरात, तुकाराम गावडे यांनी अभिनंदन केले आहे.

रासपच्या या यशासाठी मायाप्पा पोकळे, रामचंद्र गावडे, बाळासाहेब पोकळे, विश्वास गोफने, आप्पासाहेब ठोंबरे, भीमराव बाबर, मोहनराव गोफने, शामराव मदने, संदीप नाळे, विकास शिंदे, महेंद्र गोफने, अशोक शेवते, डॉ.अनिल बोराटे, श्रेयस गोफने, श्रीरंग शेवते, धनाजी नाळे, अशोक गोफने, सूरज गोफने, अमोल चवरे, रामदास पोकळे, धीरज गावडे, माऊली चवरे, धनाजी राऊत, विजय शेंडगे, दादा नाळे, ओमकार नाळे, आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सदरचा विजय हा माजी चेअरमन कै. आप्पासाहेब गोफने यांना समर्पित करत असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.


Back to top button
Don`t copy text!