दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२३ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयात दि. १४ मार्च रोजी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधानाच्या सर्व भागांचे पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.रोहिणी भंडलकर (विधी महाविद्यालय, फलटण) या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमामध्ये भंडलकर यांनी मुलींसाठी व घरगुती हिंसाचार याबाबतीत असलेले कायदे यांच्याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना असे सांगितले की, संविधानाची जागृती चळवळ उभी राहिली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन करून ते समजून घेतले पाहिजे आणि समाजामध्ये त्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मदन पाडवी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल कांबळे या विद्यार्थ्याने तर कार्यक्रमाचे आभार स्मिता कोकरे या विद्यार्थिनीने मानले. आयोजन व नियोजन प्रा.अक्षय अहिवळे व प्रा.संतोष कोकरे यांनी केले.