दैनिक स्थैर्य | दि. 10 डिसेंबर 2024 | फलटण | शेती महामंडळाच्या माध्यमातून एक एकर पेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांना शेतजमीन वाटपाचे आदेश काही दिवसांपूर्वी पारित करण्यात आले आहेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणून ज्यांचे आदेश पारित झाले आहेत अश्या खंडकरी शेतकऱ्यांना शेतजमीनीचा ताबा देण्याचे कामकाज सुरु झाले असल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
शेती महामंडळाच्या जिंती व फडतारवाडी गावामध्ये असणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांना जमीन निर्गमित झाली आहे. अश्या सर्व शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करण्यात येत आहे.