ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतांसमवेत महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत सकारात्मक चर्चा – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । मुंबई । महिला सक्षमीकरण व विकासाच्या विविध योजना व उपक्रम महिला व बालविकास विभागामार्फत राबविल्या जातात.  या योजना व उपक्रमाबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतांसमवेत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांचे यासाठी सहकार्य मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन यांनी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी तसनिम वाहनवटी उपस्थित होत्या.

महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याची माहिती यावेळी मंत्री ॲड. ठाकूर  यांनी दिली. महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त व महिला व बालविकास आयुक्त यांच्या समवेत पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करावे,असे निर्देश संबंधितांना दिले.

कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन म्हणाले, महिलांचे सक्षमीकरण तसेच महिलांचे विविध प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळेल. तसेच महिला सक्षमीकरणाच्या योजना  राबविण्यासाठी सामाजिक संस्थांची मदतही घेतली जाईल.


Back to top button
Don`t copy text!