सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा – कामगार मंत्री सुरेश खाडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२३ । नवी दिल्ली । सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

येथील संचार भवनात मंत्री श्री. खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यात रेल्वेशी संबंधित विषयांवर चर्चा केली असून संबंधित निवेदनेही केंद्रीय रेल्वे मंत्री यांना यावेळी दिले.

यामध्ये सांगली जिल्ह्यातील अराग-मिरज येथे रेल्वे अंडर ब्रिज (RUB) असा रेल्वेचा प्रस्ताव असून यासाठीचे कंत्राट देण्याकरिता निविदा काढण्यात आली आहे. या प्रक्रियेला रद्द करून  या ठिकाणी  रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्यात यावे, अशी मागणी  श्री. खाडे यांनी केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री.वैष्णव यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करण्याबाबतचे तत्काळ निर्देश दिले, असल्याचे श्री. खाडे यांनी सांगितले.

यासह सांगली जिल्ह्यातील येरळा नदीवरील रेल्वेच्या जागेतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते रेल्वे विभागाकडून बांधावे, अशी मागणीही केली. सांगली येथील रेल्वे स्थानकाचे शेड अपूर्ण असून ते पूर्ण व्हावे. याशिवाय सीएसटीएम कोल्हापूर-तिरूपती महालक्ष्मी एक्सप्रेस ही रोज चालणारी गाडीचे नूतनीकरण व्हावे. काही गाड्यांचा थांबा सांगली रेल्वे स्थानकांवर व्हावा. सांगली आणि परिसरातील लोकांची अध‍िक प्रवास असलेल्या स्थानकांपर्यंत नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी श्री. खाडे यांनी यावेळी केली.

मिरजमध्ये क्रीडा संकुलची केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे मागणी

मिरज येथे क्रीडा संकुल असावे असे निवेदन आज सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री श्री. खाडे यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दिले. खेलो इंडिया अंतर्गत मिरज येथे क्रीडा संकुलाची मागणी श्री. खाडे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे केली. केंद्रीय क्रीडा मंत्री श्री. ठाकूर यांनी याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी माहिती बैठकीनंतर श्री खाडे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!