फलटण-पंढरपूर आणि सातारा-पंढरपूर रेल्वे मार्गाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण दि.२०: फलटण-पंढरपूर आणि सातारा-पंढरपूर व्हाया दहिवडी, म्हसवड या दोन्ही प्रलंबीत रेल्वे मार्गांच्या मागणीनुसार पुढील आवश्यक कार्यवाही बाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी संबंधीत विभागाला स्पष्ट सूचना केल्या असल्याने लवकरच या दोन्ही रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक माहिती उपलब्ध होईल याची खात्री खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

माढा मतदार संघातून केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचल्यापासून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विविध प्रलंबीत प्रश्नांना गती देऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी यशस्वीरीत्या प्रयत्न सुरु ठेवले असून त्याचाच परिणाम म्हणून वरील दोन रेल्वे मार्गाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोणंद-फलटण-बारामती या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे फलटण पर्यंत काम पूर्ण होऊन त्यावरुन प्रायोगिक तत्वावर प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली होती, मात्र फलटण-बारामती रेल्वे मार्ग रखडला असताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जुन्या फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाला संपूर्ण माहिती देऊन या मार्गाचे सर्वेक्षण पूर्वी झाले असून प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी आवश्यक जमिनी रेल्वे कडे असल्याचे निदर्शनास आणून देत सदर रेल्वे मार्ग पूर्ण करुन लोणंद-फलटण-पंढरपूर या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरु करण्याची आग्रही मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली असून या मागणीचा पाठपुरावा सतत सुरु ठेवल्याने लवकरच हा मार्ग अस्तित्वात येईल अशी अपेक्षा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

सातारा-पंढरपूर व्हाया दहिवडी, म्हसवड या प्रलंबीत रेल्वे मार्गाच्या पूर्ततेसाठी लोकसभेत पोहोचल्यापासून खा. रणजितसिंह यांनी सतत पाठपुरावा केल्यानेअखेर रेल्वे मंत्र्यांनी या मार्गाच्या कार्यवाहीबाबत सूचना दिल्या आहेत, सदर रेल्वे मार्गामुळे म्हसवड, फलटण येथे होत असलेल्या औद्योगिक वसाहती, त्यातून वाढणारे उद्योग व्यवसायांना दळण वळणाची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे, पंढरपूर, म्हसवड, गोंदावले या तिर्थक्षेत्रांचे ठिकाणी येणारे भाविकांना जवळचा व सुखकर मार्ग उपलब्ध होईल तसेच शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही हा रेल्वे मार्ग निश्रि्चत उपयुक्त ठरणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या दोन्ही रेल्वे मार्गामुळे कायम दुष्काळी पट्ट्यात मोडणार्‍या फलटण, माण, सांगोला, पंढरपूर वगैरे तालुक्यातील औद्योगिक व व्यापार विषयक उपक्रमांना चालना मिळाल्याने आर्थिक विकास गतिमान होणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!