पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस १ सप्टेंबरपासून प्रतिबंध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । सातारा । धार्मिक उत्सव साजरे करताना नैसर्गिक जलस्रोतांच्या गुणवत्तेवर व पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यास प्रोत्साहित करणे यासाठी  जिल्हाधिकारी सातारा यांनी  दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सातारा जिल्हयातील विक्रीसाठी तयार असणाऱ्या पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती वितरण व विक्री करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती उत्पादन करण्यास दि. 9 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात आलेली आहे.

तसेच  दि. 01 सप्टेंबर 2022 पासून सातारा जिल्हयामध्ये  पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मूर्ती बनविणे, आयात करणे, वितरण करणे, खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे. याची सर्व मूर्तीकार व मूर्ती विक्रेते यांनी नोंद घ्यावी.


Back to top button
Don`t copy text!