पूजा फडतरे हिची शिवाजी विद्यापीठ खो-खो संघात निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयाची खो-खो खेळाडू कु. पूजा फडतरे हिची शिवाजी विद्यापीठ खो-खो संघामध्ये निवड झाली.

महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा क्रीडा महोत्सव २०२४ ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठ, लोणारे या ठिकाणी झाल्या. या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ खो-खो महिला संघाने सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत मुधोजी महाविद्यालयाची पूजा फडतरे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!