स्थैर्य, दि.९: कोरड्या दुष्काळाची सवय झालेल्या या भागाला दोन वर्षांपासून पडत असलेल्या पावसामुळे पहिल्यांदा ओला दुष्काळ काय असतो ते पाहायला मिळाले. सततचा पाऊस, विविध रोगांचा सामना करत माणमधील मोहीच्या सचिन देवकर या शेतकऱ्याने डाळिंबाची चांगली जोपासना केली. या बागेचा तोडा सुरू झाला असून, जागेवर माल देण्यापेक्षा ते पुणे येथील के. डी. चौधरी फ्रूट कंपनीत माल नेत आहेत. उच्च प्रतीचा व दर्जेदार माल असल्यामुळे त्यांच्या मालाला सलग तीन दिवस उच्चांकी दर मिळाला आहे. 250 रुपये प्रतिकिलो हा त्यांना उच्चांकी दर मिळाला. यामुळे त्यांचा कंपनीच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
डाळिंब तोडण्यास आली असताना काही व्यापारी बागेतून फिरून गेले. चांगले दर असतानाही व्यापारीवर्ग चांगल्या मालाचेही दर पाडून मागू लागले. त्यामुळे माल जागेवर न देता पुण्याच्या मार्केटमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. चांगल्या मालाला मार्केटमध्ये एक्स्पोर्ट दरापेक्षाही चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल मार्केटलाच नेणे योग्य आहे, असे मोहीतील शेतकरी श्री. देवकर यांनी सांगितले.