कृषि महाविद्यालय येथे पॉलिहाऊस व्यवस्थापनाचे प्रशिक्षण


दैनिक स्थैर्य । 4 जुलै 2025 । फलटण । येथील कृषी महाविद्यालय येथे बी. एस. सी. कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पॉलिहाऊस तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांना पॉलिहाऊस उभारणी, संरक्षित पीक पद्धती त्यामध्ये घेतली जाणारी विविध पिके पिकांना लागणारे वातावरण व माती पिकावर येणार्‍या वेगवेगळ्या किडींवर रोग या विविध मूलभूत घटकांचा अभ्यास केला जातो. संरक्षित पीक पद्धतीत पॉलिहाऊस मधील वातावरणात आद्रता व तापमान नियंत्रित केले जाते. पिकांना खते व पाणी देण्याच्या पद्धती अभ्यासल्या जातात तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून संरक्षित भाजीपाला पिकाचे उत्पादन करून त्याची कारणे पॅकिंग व विक्री केली जाते.

तसेच या प्रशिक्षण दरम्यान पॉलिहाऊस उभारणी करता लागणारे स्टील, पोलिथीनचे प्रकार, शेड उभारणी साठी लागणारे साहित्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात येते. फलटण तालुक्यातील युवकांनी पॉलिहाऊस प्रशिक्षणाचा फायदा घेऊन कृषि क्षेत्रातील उद्योजकता विकसित करण्याची संधी म्हणून पहावी. अशा प्रकारे पॉलिहाऊस व्यवस्थापनाची परिपूर्ण व्यावसायिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण व उद्योजकता विकास व्हावा हा यामागील उद्देश आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. डी. रोमन, उद्यानविद्या विभाग, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!