फोटो व्हायरल करून राजकीय अस्तित्व संपवता येत नाही : अमित रणवरे

विक्रम भोसले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबतच; विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न


स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑगस्ट : फोटो व्हायरल करून कोणत्याही कार्यकर्त्याचे राजकीय अस्तित्व संपवता येत नाही, असे स्पष्ट मत भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष अमित रणवरे यांनी व्यक्त केले आहे. साखरवाडी येथील महायुतीचे नेते विक्रम (आप्पा) भोसले यांचा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

याबाबत अधिक माहिती देताना अमित रणवरे म्हणाले की, “साखरवाडी कारखान्याच्या थकीत कर आणि कामगारांच्या देय रकमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी विक्रम भोसले, माजी उपसरपंच अक्षय रुपनवर आणि इतर प्रतिनिधी कारखाना प्रशासनाला भेटण्यासाठी गेले होते. त्याचवेळी आमदार रामराजे हे देखील तेथे उपस्थित होते. त्यांनीच स्वतःहून विक्रम भोसले यांना बोलावून फोटो काढला, जो आमच्या विरोधकांनी जाणीवपूर्वक व्हायरल केला.”

विक्रम भोसले आणि साखरवाडीतील महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत आहेत. फलटणचा विकास केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातूनच होत आहे, हे तालुक्यातील जनतेने ओळखले आहे. त्यामुळे असे फोटो व्हायरल करून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही रणवरे यांनी ठणकावून सांगितले.


Back to top button
Don`t copy text!