
दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा शहरालगत असणाऱ्या गोळीबार मैदान येथील पोलीस वसाहतीमधून एका पोलिसाचीच दुचाकी चोरीला गेली. याबाबतची तक्रार गणेश कापरे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हणाले आहे की, कापरे हे जिल्हा पोलिस दलात असून गोळीबार मैदान पोलीस वसाहतीत राहतात. त्यांनी त्यांची दुचाकी वसाहतीमधील इमारतीसमोर पार्क केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने मंगळवार, दि. २३ रोजी ती चोरुन नेली. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार पोळ हे करत आहेत.