
दैनिक स्थैर्य | दि. 25 जुलै 2025 । फलटण । फलटण शहरात पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवली आहे.
कुंभारटेक, मलठण येथे काही मुले पतंग उडवताना दिसले. पोलीस त्यांच्याकडे जात असताना, वरील मुले पतंगाचा दोरा टाकून पळून गेली. त्यांचा शोध घेण्यात येत आहे आणि पोलीसांनी तेथे नायलॉन आणि मांजा धाग्याचे रीळ जप्त केले आहे.
जब्रेश्वर मंदिर, कसबा पेठ, फलटण येथे पोलिसांनी ८०० रुपयांचे नायलॉन मांजा जप्त केले. या गुन्ह्यासाठी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरण्याच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी दररोज मोहीम राबवली आहे. या अभियानात महिला पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, महिला पोलीस नाईक हेमा पवार आणि पोलीस शिपाई गणेश माने यांनी गस्त करून कारवाई केली.
पोलिसांनी पतंग उडवणाऱ्या मुलांचा शोध घेतला जात आहे आणि पालकांनी मुलांना गुन्हे करण्यास मदत केल्यास, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.