गांजा बाळगणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । सातारा । वाई शहरातील मधली आळी येथील प्रियांका अपारमेन्टमध्ये चोरून गांजा विकणाऱ्या 35 वर्षाच्या महिलेवर वाई पोलिसांनी कारवाई करून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. उमा संतोष सोंडकर असे त्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना खास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वाई पोलिसांनी मधली आळी येथील प्रियांका अपारमेन्टमध्ये छापा टाकला असता उमा सोंडकर ही गांजा विकत असल्याचे आढळून आले. तिच्याकडून 690 ग्राम वजनाचा 5 हजार रुपयांचा गांजा मिळून आला. तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपअधीक्षक डॉ.शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महिला पोलीस नाईक सोनाली माने, पोलीस कॉ सोमनाथ बल्लाळ, श्रावण राठोड, किरण निंबाळकर यांनी सहभाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!