
स्थैर्य, सातारा, दि. 31 : वारणा नदीवर कोल्हापूर व सांगली जिल्हा हद्दीवर चिकुर्डे फाटा येथे कोडोली व सांगली जिल्ह्यातील कुरळप पोलीस स्टेशन चे चेक पोस्ट आहेत दि 28 रोजी या पोस्टवर कुरळप पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सचिन मोरे हे सुद्धा कर्तव्य बजावत होते. यावेळी अनेक लोक प्रवास करत असतात याच वेळी चिकुर्डे चेक पोस्टवर मांगले गावचे रहिवासी सुहास रामचंद्र रोकडे व त्यांच्या पत्नी सुजाता सुहास रोकडे या दवाखान्यात कोल्हापूर येथे गेल्या होत्या. गावी जाताना त्यांचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र गहाळ झाले. ते कुरळप पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन मोरे यांना सापडले. याबाबत सर्व व्हाट्सअप ग्रुपला कल्पना दिली व ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले. त्यावेळी मांगले येथील रोकडे दांपत्य याना हि माहिती मिळाली त्यांनी मोरे यांच्याशी संपर्क साधला त्या दांपत्यास सचिन मोरे यांनी हा मोलाचा दागिना.. प्रामाणिकपणे कसलेही बक्षिस न स्वीकारता दिला . हा दागिना घेताना अक्षरशः या दांपत्याला गहिवरुन आले व शाबासकीची थाप सचिन मोरे याना दिली व मोरे यांच्यामुळे आमचा हा अनमोल दागिना परत मिळाल्याची भावना व्यक्त केली. कॉन्स्टेबल सचिन मोरे यांचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कुरळप पोलिसांनी दाखवलेली हि प्रामाणिकता सर्वांच्या कौतुकाचा विषय बनली आहे.