गेंडा माळ नाका येथे गुटखा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात 1 लाख 59 हजाराचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२१ । सातारा । सातारा शहरालगत असणाऱ्या अंजली कॉलनी परिसरातील गेंडामाळ नाक्यावरुन गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला शाहूपुरी पोलिसांनी पकडले आहे. संतोष अंकुश देवरुखे (रा. डबेवाडी, ता. सातारा) याला पकडण्यात आलेल्याचे नाव असून त्याच्याकडून १ लाख ५९ हजार ८७५ रुपयांचा गुटखा जप्त केला. दरम्यान, अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवरुखे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्ह प्रकटीकरण शाखेचे पथ गुरुवार, दि. ७ रोजी रात्रगस्त घालत असताना एकजण मारुती ओमनी व्हॅनमधून (एमएच ११ – एडब्ल्यू ९४१३) गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे संबंधित चारचाकी पोलिसांनी अंजली कॉलनी – गेंडामाळ रस्त्यावर अडवली असता त्यात १ लाख ५९ हजार ८७५ रुपयांचा गुटखा आढळला. चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने संतोष अंकुश देवरुखे असे नाव सांगतच हा गुटखा सातारा परिसरात विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली.

दरम्यान, शाहूपुरी डीबीने याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिल्यानंतर येथे त्यांचे अधिकारी दाखल झाले. यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार यांनी फिर्याद दिली. या कारवाईत हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार आदी सहभागी झाले होते. याचा अधिक तपास सहायक फौजदार शब्बीरखान मोकाशी करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!