स्थैर्य, फलटण : एक गाई व २ लहान वासरांची बेकायदेशीर वाहतूक केल्याच्या आरोपावरुन प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार फलटण शहर पोलीस ठाण्यातएकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनासह एक गाई व २ वासरे असा एकूण ४ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज पोलीसांनी ताब्यात घेतला असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल जलील कुरेशी, रा. कुरेशीनगर फलटण यांनी आपल्या ताब्यातील MH 11 AG 3629 या वाहनात एक तांबड्या रंगाचे दीड वर्ष वयाचे जर्सी जातीचे खोंड, एक पांढरे व तांबडे रंगाचे दीड वर्षे वयाचे जर्सी जातीचे खोंड, एक पांढरे व तांबडे रंगाचे अंदाजे दोन वर्षे वयाची गाई दाटीवाटीने व क्रूरतेने विना परवाना घेऊन जाताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध वरीलप्रमाणे आरोपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक पोमण यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस हवालदार गारडी करीत आहेत.