स्थैर्य, सातारा, दि. १०: गोडोली तळ्यात गटांगळ्या खात असलेल्या महिलेचे प्राण वाचवण्याचे काम शहर पोलीस ठाण्याचे अमंलदार यांनी केल्याने देव तारी त्याला कोण मारी याचा अनुभव आज प्रत्यक्ष आनुभवयला मिळाला.
सातारा गोडोली पोलिस चौकीमध्ये गुन्हे निर्गतीचे काम पोलीस नाईक दगडे करीत असताना. पोलीस चौकी बाहेर जेवणासाठी चाचाने दिलेला डबा आणणेसाठी चौकी बाहेर गेले होते. त्यावेळी गोडोली पोलीस चौकी शेजारी असणारे तळ्यामध्ये कोणीतरी पाण्यात बुडून मदतीसाठी धडपडत असल्याचे व गटांगळ्या खात असल्याचे पो. ना. दगडे यांना दिसले. त्यांनी तात्काळ चौकी अंमलदार पोलिस हवालदार जाधव (ब नं 1066) व होमगार्ड सुर्यवंशी यांना माहिती दिली. दरम्यान याठिकाणी कामानिमित्त आलेले सातारा सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. मुल्ला यांनी गोडोली तळ्यामध्ये सुरू असलेली पोलिसांची धावपळ पाहुन ते देखील मदतीला धावले. येथील होमगार्ड सुर्यवंशी, हवालदार जाधव व पोलिस नाईक दगडे यांच्या मदतीने गटांगळ्या खात असलेल्या महिलेला त्यांनी वेळीच पाण्याबाहेर काढले. यावेळी डॉ. मुल्ला यांनी महिलेची तपासणी करुन महिला ठिक असल्याचे सांगितले. या महिलेला पि सी आर नं 1 चे नाईट ड्युटी पोलिस नाईक यादव व होमगार्ड यांचेसोबत चालक पो.ना.कोकणी यांनी त्यांचे राहते घरी सुखरुप पोहोच केलं. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आला व एका महिलेस जिवदान मिळालेचे समाधान आम्हां पोलिस व डाँ.चे माणुसकी चे दर्शन घडले.