
दैनिक स्थैर्य । 30 जुलै 2025 । फलटण । रा. माळेगाव, ता. बारामती येथील शिवाजी पाडूरंग नरूटे यांची अडीच तोळ्याचे मंगळसूत्र असलेली पिशवी गुरुवार दि. 24 जुलै रोजी श्री. भिवाईदेवी दर्शनाचे घेताना गहाळ झाली होती.
यासंदर्भात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महाडीक, पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पिशवीचा शोध पोलीस हवालदार एम.एम. पिसे व पोलीस हवालदार ए. यु.पवार यांनी भिवाईदेवी मंदीर परीसरात घेतला. त्याठिकाणी असलेल्या रुकसाना कबिर शेख यांनी प्रमाणीकपणामुळे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र असलेली पिशवी पोलीसांना दिली.
पोलिसांनी अडीच तोळ्याचे मंगळसूत्र असलेली पिशवी शिवाजी पाडूरंग नरूटे यांच्याकडे सुपुर्द केली. या शोध मोहिमेत माजी सरपंच नानासो भिसे, मंदिराचे पुजारी गणेश बिबे, नंदू विठ्ठल पवार, अक्षय पवार, राहूल पवार, सागर भिसे तसेच सर्व कांबळेश्वर ग्रामस्थ यांनी मदत केली.