स्थैर्य, सातारा, दि. 25 : तुमच्या गळ्यातील सोन्याचा हार छान आहे. माझे लग्नग्न ठरले आहे, मलाही असाच हार बनवायचा आहे’, अशी बतावणी करत एका महिलेने बघण्यासाठी दिलेला 50 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार दोन अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत सावित्री हरिभाऊ कांबळे (रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 23 रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास त्या घराच्या अंगणात कपडे वाळत घालत होत्या. दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरून येऊन कासार यांनी तुम्हाला आंबे दिले आहेत. आंब्याचा बॉक्स ठेवून घ्या व पिशवी मला द्या असे ते म्हणू लागले.
याच दरम्यान, दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने मी शिवथरचा साबळे आहे. तुमच्या गळ्यातील सोन्याच्या हार छान आहे, माझे लग्नग्न ठरले आहे. मला तो असाच बनवायचा आहे, जरा दाखवता का असे मला त्याने विचारले असता कांबळे यांनी त्याला 50 हजार रुपये किमतीचा सोन्याचा बघायला दिला. तो सोन्याचा हार बघण्याचा बहाणा करत ते दोघे दुचाकीवरून सोन्याचा हार घेऊन कोरेगावच्या दिशेने निघून गेले. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरटय़ांचा शोध घेत आहेत.