देहविक्रयासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटकावाई येथील तृप्ती लॉजवर पोलिसांचा छापा ः तिघांवर गुन्हा 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि.२६: वाई येथील पी. आर. चौकातील तृप्ती लॉजवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रयासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर व महिला पुरवणारा याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. मॅनेजर बसराज मानिक मान्याळ वय 43 रा. बोधेवाडी, ता. कोरेगांव हल्ली रा. तृप्ती लॉज, वाई आणि नवनाथ ऊर्फ पप्या अनिल जाधव वय -27 वर्षे रा.बावधन ता.वाई (महीला पुरविणारा) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, दि 25 रोजी वाई पोलिसांना पी.आर.चौक, ब्राम्हणशाही वाई येथे तृप्ती लॉजवर देहविक्रयासाठी मुली पुरविल्या जात असल्याची खबर मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकण्याची योजना आखली. प्रथम तृप्ती लॉजवर बोगस ग्राहक पाठवले व नंतर छापा टाकला. त्याठिकाणी वेश्यागमनाकरीता लॉज मॅनेजरने 2 महीला आणून ठेवल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मॅनेजर व वेश्यागमनाकरीता महीला पुरविणारा यांच्यासह अन्य एक अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत 2 महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आशा किरण सुधारगृह कराड येथे जमा करण्यात आलेले आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर तपास करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,  अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पो.कॉ. सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, महिला पो. नाईक दिपिका निकम, सोनाली माने यांनी सहभाग घेतला होता.

Back to top button
Don`t copy text!