दैनिक स्थैर्य । दि. ०२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू केला आहे शहरातील एकूण 20 अवैध धंद्यावर कारवाई करून एकूण 56 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे गुन्हे सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रांतर्गत दाखल करण्यात आले आहेत या कारवाईअंतर्गत एक लाख 69 हजार 593 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
समीर शेख यांच्या कार्यपद्धतीमध्ये शहर कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीचे उच्चाटन हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या कारभाऱ्यांना त्या पद्धतीचे निर्देश दिले असून दोन्ही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अवैध धंद्यांचे उच्चाटन सुरू झाले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात 12 आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये एकूण अवैध धंद्यांवर कारवाया करून एकूण 56 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या वीस गुन्ह्यांमध्ये एकूण एक लाख 69 हजार 593 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दारूबंदी कायद्यान्वये सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे एक ,औंध पोलीस स्टेशन येथे दोन, वडूज पोलीस स्टेशन येथे चार असे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांच्याकडून 7447 रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.