दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । फलटण । त्रिपुरा राज्यातील कथीत घटनेच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात कायदा सुव्यवस्था परिस्थिती अबाधीत राखणे कामी शहरातून पोलीस पथ संचलन आणि म. फुले चौक येथे जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम/सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही उपक्रमात फलटण शहर पोलीस ठाणे कडील ३ अधिकारी, २० पोलीस अंमलदार, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडील २ अधिकारी १० पोलीस अंमलदार, लोणंद पोलीस ठाणे कडील ५ पोलीस अंमलदार असे लाठी, हेल्मेट, ढाल, गॅस गन, हॅण्डग्रेनेड, दारुगोळ्यासह सहभागी झाले होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत महात्मा फुले चौक येथे जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम सराव घेण्यात आला, त्यानंतर म. फुले चौक, गजानन चौक, श्रीराम मंदिर, पाचबत्ती चौक, कुरेशी नगर, मंगळवार पेठ, बारामती चौक, छ. शिवाजी महाराज चौक, एस.टी. बस स्थानक असा रुट मार्च (पथ संचलन) काढण्यात आला.
रुट मार्च दरम्यान फलटण बसस्थानक येथील संपामध्ये सहभागी असलेले चालक – वाहक यांच्यासोबत उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी चर्चा करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता शांतता राखणे संदर्भात आवाहन केले. सदर वेळी संपामध्ये सामील ४० ते ५० चालक – वाहक उपस्थित होते.
जातीय दंगा काबू योजनेकरिता ५ सरकारी ४ चाकी वाहने, २ मोटरसायकली, अग्निशामक, रुग्णवाहिका यांच्या सह वरील सर्व पोलीस अधिकारी/कर्मचारी सहभागी झाले होते.