दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । दहिवडी । माण- खटाव तालुक्यातील पोलीस पाटील ७८ पदे रिक्त होती, उपविभागीय स्तरावर रिक्त पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबविण्याचा सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या पदांची लोकसंख्येनुसार प्रवर्गनिहाय आरक्षणातून ३० टक्के महिला आरक्षण सोडत झालेली आहे. हा सोडत कार्यक्रम दहिवडी ता. माण येथील उपविभागीय कार्यालयात माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
सदर आरक्षण सोडत प्रवर्ग व महिला आरक्षणानुसार माण तालुका गाव निहाय पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण प्रवर्ग- अनुसूचित जाती – संभूखेड, अनुसूचित जमाती-बोडके, कोळेवाडी, इतर मागास- दोरगेवाडी, आंधळी, -शिंदी खुर्द, , खंड्याचीवाडी, गटेवाडी, खोकडे, सर्वसाधारण खुला प्रवर्ग-जाशी
तर महिला प्रवर्ग- अनुसूचित जाती- ढाकणी, अनुसूचित जमाती-मोगराळे, येळेवाडी, भटक्या जमाती क- शेवरी, इतर मागास – काळेवाडी(नरवणे), गाडेवाडी, , पांगरी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक – गरडाचीवाडी.
तर खटाव तालुका पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण प्रवर्ग- अनुसूचित जाती- कामठी परळी, चोराडे, ढोकळवाडी, धोंडेवाडी, अनुसूचित जमाती-गोपूज, मुसांडेवाडी, खातगुण, खटाव, नागनाथवाडी, वेटणे, घेरेवाडी,
विशेष मागास – कारंडेवाडी, विमुक्त जाती अ- चिंचणी, रेवलकरवाडी, डाळमोडी, अंबवडे, खरशिंगे, भटक्या जमाती ब- अन्भेरी, भटक्या जमाती क- गारुडी, इतर मागास – शिरसवडी, पुसेसावळी, वर्धनगड, गोरेगाव वांगी, पळसगाव, मोराळे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक- शेडगेवाडी, पाचवड,पोफळकरवाडी, सर्वसाधारण खुला प्रवर्ग-येळीव, रामोशीवाडी, फडतरवाडी-नेर, फडतरवाडी- बुध, माने/तुपेवाडी, गादेवाडी, कानकात्रे, रामेश्वर, सुंदरपूर, वडखळ.
महिला प्रवर्ग- अनुसूचित जाती- होळीचागाव, मरडवाक, अनुसूचित जमाती-जाखणगाव, इतर मागास – चितळी, कोकराळे, विमुक्त जाती अ- दातेवाडी, अनफळे, भटक्या जमाती ब – मोळ, बुध, इतर मागास- काटेवाडी, कटगुण, विखळे, लाडेगाव, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक-गुंडेवाडी, सर्वसाधारण खुला प्रवर्ग- कातळगेवाडी, निमसोड, सुर्याचीवाडी असे सोडती मधील आरक्षण आहे. सोडत कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार हेमंत दिक्षित, प्रवीण फुके यांनी विशेष सहाय्य केले.