पोलीस पाटील भरती सन 2022 भरती प्रक्रिया पात्र उमेदवारांनी 16 मार्च रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । सातारा । पोलीस पाटील भरती सन 2022 भरती प्रक्रिया सुरु असून, दि. 13 मार्च 2022 रोजी लेखी परीक्षा झाली आहे. या लेखी परिक्षेमधून तोंडी / मुलाखत परिक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी  उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा, तहसिल कार्यालय सातारा व जावली तसेच  संबंधित गावचे चावडीवर प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची तोंडी / मुलाखत दि. 16 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी सातारा कार्यालयात होणार आहे. तरी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी आपल्याकडील मूळ कागदपत्रांसह विहीत वेळेमध्ये उपस्थित राहण्याबाबत उविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी आवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!