दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२२ । सातारा । उपविभागीय दंडाधिकारी, सातारा उपविभाग, सातारा यांच्या कार्यालयामार्फत उपविभाग सातारा अंतर्गत सातारा व जावली महसूली उपविभागातील सातारा व जावली तालुक्यातील गावांसाठी, ती गांवे ज्या प्रवर्गामध्ये दर्शविण्यात आली आहेत, त्या प्रवर्गाकरिता पोलीस पाटील या पदाकरिता, गावनिहाय एका जागेसाठी अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली आहे.
पोलीस पाटील भरती 2022 चा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : जाहिरनामा प्रसिध्दीचा दि. 22 फेब्रुवारी 2022, अर्ज करण्याचा कालावधी दि. 23 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 अखेर. वेळ – सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत व अर्ज स्विकारण्याचे ठिकाण – तहसिल कार्यालय सातारा (निवडणुक शाखा संगणक कक्ष) येथे (रविवार व शासकीय सुट्टी वगळून) पुराव्यांचे कागदपत्र सोबत जोडून समक्ष दाखल करावेत.
छाननीअंती पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक दि. 8 मार्च 2022. लेखी परिक्षेसाठी उमेदवारास प्रवेशपत्र देणे दि. 10 मार्च 2022. लेखी परिक्षेचा दिनांक, ठिकाण व वेळ -दि.13 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता (उपविभागीय अधिकारी, सातारा यांचे कार्यालयाचे क्षेत्रातील सातारा शहरातील सोयीचे ठिकाणी) तोंडी परीक्षा दि. 22 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मुलाखती संपेपर्यंत. स्थळ – उपविभागीय अधिकारी कार्यालय, सातारा. दि. 28 मार्च 2022 रोजी अंतिम निकाल जाहिर करणे.
अधिक माहितीसाठी संबंधितांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. मुल्ला यांनी केले आहे.