फलटण तालुक्याच्या १४ गावांतील पोलीस पाटील भरती जाहीर; अर्ज करण्याची शेवटची मुदत ४ मे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील १४ गावांतील रिक्त जागांवरील पोलीस पाटील भरतीचा कार्यक्रम फलटण उपविभागीय दंडाधिकारी यांनी जाहीर केला असून या गावांचे भरतीचे आरक्षणही प्रसिध्द झाले आहे. उमेदवारांना आपले अर्ज २५ एप्रिलपासून ४ मे पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयात समक्ष सादर करावे लागणार आहेत. अर्ज, माहितीपत्रक व इतर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत.

पोलीस पाटील भरती जाहीर झालेली गावे व त्यांचे आरक्षण असे : होळ – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), खामगाव – अनुसूचित जमाती (महिला), सासकल – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), अलगुडेवाडी – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), फडतरवाडी – अनुसूचित जमाती (महिला), वडगाव – भटक्या जमाती (ब) (महिला), तरडफ (भटक्या जमाती (ड) (महिला), कुरवली खुर्द – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), ठाकुरकी – अनुसूचित जमाती (महिला), भाडळी बु. – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), जाधववाडी (फ) – विशेष मागास प्रवर्ग (महिला), कोर्‍हाळे – भटक्या जमाती (ड) (सर्वसाधारण), कोपर्डे – भटक्या जमाती (ड) (सर्वसाधारण), तडवळे – आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक (महिला).


Back to top button
Don`t copy text!