दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । सातारा । अदखलपात्र गुन्ह्यामध्ये प्रतिबंधक कारवाईत मदत करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना चिंचणेर वंदन ता. सातारा येथील पोलीस चंद्रकांत तुकाराम बर्गे याला सोमवारी सापळा रचून ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिलेल्या माहिती नुसार तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये कार्यकारी दंडाधिकारी सातारा यांच्यासमोर प्रतिबंधक कारवाई मध्ये मदत करण्यासाठी पोलीस पाटील बर्गे यांने ( वय 47 मूळ रा चिंचणेर वंदन ) वीस हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारने या प्रकरणी आपली तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या आदेशानंतर पोलीस निरीक्षक विशाल गिरी पोलीस अंमलदार प्रशांत ताटे, विशाल खरात संभाजी काटकर यांनी सापळा रचला. आणि आज दुपारी बर्गे याला पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते .