स्थैर्य, वाई, दि. ०९: वाई तालुक्यातील मुंगसेवाडीत येथे आज दुपारी दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारीची घटना घडली. यामध्ये एका गटाच्या हल्ल्यात गावचे पोलीस पाटील जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गतातले किरकोळ जखमी झाले आहेत.परस्पर विरोधी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या आहेत.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस पाटील दीपक निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंगसेवाडी (वाई)येथील ओढ्याच्या पाईपमध्ये अडकलेला कचरा सरपंच विशाल रामचंद्र सुळके, ग्रामपंचायतीचे सदस्य शंकर तानाजी वरे, नामदेव, शांताराम निकम, शशिकांत गुलाबराव घाडगे, गावचे पोलिस पाटील दिपक बबन निकम असे सर्वजण काढून सफाई करत होते. यावेळी
विठ्ठल बापुराव कासुर्डे हे मोटारीने जात असताना या ठिकाणी गटाराचे काम संपे पर्यंत गाडी या रस्त्यावरुन आणु नको, असे सांगितले.त्याचा व पुर्वीचा राग मनात धरून विठ्ठल बापुराव कासुर्डे याने मनात धरून तो लगेच त्याच रस्त्यावरुन आला. त्या वेळी त्याने त्याचा भाऊ किरण बापुराव कासुर्डे याला हातात लोखंडी बार घेऊन सोबत आणला होता.तर वडील बापुराव कासुर्डे हेही हातात काठी घेऊन घटनास्थळावर दाखल झाले.त्या वेळी गावचे सरपंच विशाल सुळके व इतर उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसमोरच गावचे पोलिस पाटील दीपक बबन निकम यांच्या बरोबर बाचाबाची झाली. नंतर तुंब्बळ मारामारी झाली. त्यात पोलिस पाटील, त्यांचे चुलते दिलिप नारायण निकम दीपक निकम आणि त्यांची पत्नी रेश्मा हे दोघेही जखमी झाले आहेत, असे म्हटले असून विठ्ठल कासुरडे यांनी ही दीपक निकम यांच्यासह इतरांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.अधिक तपास पोलीस नाईक शिवाजी वायदंडे करत आहेत.