बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर फलटण शहरात पोलीस संचलन


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । फलटण । आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर फलटण शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरामधुन पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी संचलन केले.

उद्या बुधवार, दिनांक 21 जुलै रोजी बकरी इद सण साजरा होणार आहे. या सणाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या संचलनामध्ये 5 पोलीस अधिकारी, 20 पोलीस अंमलदार, 12 होमगार्ड, सीमा राखीव दलाचे 24 अंमलदार, राखीव दलाचे 11 अंमलदार सहभागी झालेले होते, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिली.

सदरचे संचलन हे श्रीराम मंदिर – पाचबत्ती चौक – मंगळवार पेठ – बारामती चौक – शिवाजी चौक – नानापाटील चौक – बारामती पुल – कुरेशी नगर ह्या मार्गाने घेण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!